mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Chhatrapati Sambhaji Nagar: राज्यस्तरीय भक्तीगीत गायन स्पर्धा;  संतोष दोडे यांना द्वितीय पारितोषीक

शेअर करा :

Chhatrapati Sambhaji Nagar:  स्वामी विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या संगीत महोत्सव २०२६ मधील राज्यस्तरीय भक्तीगीत गायन स्पर्धेत वैजापूर येथील गायक संतोष दोडे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.

Chhatrapati Sambhaji Nagar

वैजापूर :  स्वामी विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या संगीत महोत्सव २०२६ मधील राज्यस्तरीय भक्तीगीत गायन स्पर्धेत वैजापूर येथील गायक संतोष दोडे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
स्वामी विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक पंढरीनाथ पाटील (भाऊ) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत खुल्या गटातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दोडे यांना मिळाले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. इवलेसे रोप लावीयेले द्वारी हा महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग तिलक कामोद रागामध्ये दोडे यांनी सादर केला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, सचिव श्रीमंतराव शिसोदे, कोष्याध्यक्ष तुषार शिसोदे, प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे, नंदकुमार गवंडर, गिरजीनाथ जाधव, दौलतराव मनाळ, बाबासाहेब तागड, दिलीप राऊत, जनार्दन गायकवाड, राजू गोरक्ष यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको