mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

अंबादास दानवे यांनी पकडली भाजप सदस्याची कॉलर; छत्रपती संभाजीनगरात पंचायत समिती निवडीवेळी गोंधळ | Ambadas Danve grabs BJP member collar

शेअर करा :

Ambadas Danve grabs BJP member collar : छत्रपती संभाजीनगर येथे पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीदरम्यान मोठा गोंधळ. शिवसेना (उबाठा) सदस्य पळविल्याचा आरोप करत अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडल्याने तणाव निर्माण.

Ambadas Danve grabs BJP member collar

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीच्या कार्यक्रमादरम्यान मंगळवार, १० मार्च रोजी मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सदस्य पळविल्याचा आरोप करत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची भररस्त्यात कॉलर पकडल्याने पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

👉 राज्यभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी वाचा : राजकारण

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया मंगळवारी पार पडत होती. या निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू असतानाच, छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षाचे तीन सदस्य भाजपने पळविल्याची चर्चा सुरू झाली.

ही माहिती समजताच विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच डॉ. बाळासाहेब थोरात यांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली. यावेळी दानवे यांनी भाजपचे सदस्य कल्याण गायकवाड यांना थेट जाब विचारत “आमचे सदस्य कुठे आहेत?” असा प्रश्न उपस्थित केला. याचवेळी संतप्त झालेल्या दानवे यांनी गायकवाड यांची कॉलर पकडल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कल्याण गायकवाड यांची अंबादास दानवे यांच्या तावडीतून सुटका केली.

👉 राज्यभरातील ताजा घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र

दरम्यान, शिवसेना (उबाठा) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर दानवे कार्यकर्त्यांसह हातात काठी घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर बसल्याचेही पाहायला मिळाले.

याबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी आरोप केला की, “आमच्या तीन सदस्यांना भाजपने सत्तेची ताकद आणि पैशाचा वापर करून पळवले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून आम्ही हे सहन करणार नाही.” या प्रकरणाबाबत आपण लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 राज्यभरातील गुन्ह्ये विषयक ताजा घडामोडींसाठी वाचा : गुन्हेवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको