

अकोला : पुणे येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे नुकतीच पार पडलेल्या Proactive National Abacus Competition 2025–26 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. देशभरातील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महाराष्ट्रासह गोवा, बेंगळुरू, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि दिल्ली येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या स्पर्धेसाठी अकोला येथील Advik Proactive Abacuss Academy मधील १३ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी देवांश प्रशांत सरागे याने उत्कृष्ट कामगिरी करत देशातून १४ वा क्रमांक मिळवला.
तसेच अकॅडमीच्या १२ विद्यार्थ्यांना “Best Performance” ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये मोहित कैलास बनसोड, श्रेयांश विशाल कोकिवार, नैतिक शरद कांबळे, कृष्णा संजय नपते, श्रेया राजेश अरुळकार, स्वराज प्रदीप डांगे, यश संतोष सांगळे, स्नेहल संतोष सांगळे, प्राऊंश प्रकाश शिरसाट, ईश्वरी योगेश ढवळे, अंश सुनिल इंगळे आणि प्रथमेश प्रवीण शेरेकर यांचा समावेश आहे.
यापूर्वी जुलै २०२५ मध्ये अकोल्यात झालेल्या रिजनल लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये Advik Proactive Abacuss Academy चे ४० विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांची निवड नॅशनल लेव्हल स्पर्धेसाठी करण्यात आली होती. या रिजनल स्पर्धेत अकोल्यासह वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.



