mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Manora News : घरकुल अनुदानासाठी लाभार्थ्यांचे ‘भीक मागो’ आंदोलन; ईंझोरी परिसरात संतापाचा उद्रेक

शेअर करा :

Manora News : मानोरा तालुक्यातील ईंझोरी परिसरात घरकुल अनुदानाचे हप्ते न मिळाल्याने लाभार्थ्यांनी पंचायत समितीसमोर ‘भीक मागो’ आंदोलन केले.

Manora News
मानोरा : तालुक्यातील ईंझोरी परिसरातील शेकडो पात्र घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून मंजूर झालेले घरकुल अनुदानाचे हप्ते अनेक महिन्यांपासून न मिळाल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त लाभार्थ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांसह 19 जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन करत शासन व प्रशासनाचा निषेध केला.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांअंतर्गत ईंझोरी परिसरासह तालुक्यातील पाच महसूल मंडळांतील शेकडो नागरिकांना घरकुल मंजूर झाले आहे. पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसरा व तिसरा हप्ता वेळेवर मिळेल, या अपेक्षेने अनेक लाभार्थ्यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलून घरांचे बांधकाम पूर्ण केले. मात्र पुढील हप्ते रखडल्याने कर्जाचा डोंगर वाढत असून, वाढत्या व्याजामुळे लाभार्थी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

या गंभीर परिस्थितीबाबत 13 जानेवारी रोजी पंचायत समिती प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर लाभार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

थंडीच्या दिवसांत अनेक गरीब लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ येत असून तातडीने थकलेले घरकुल अनुदानाचे हप्ते अदा करावेत, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ईंझोरी परिसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको