mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

अमरावतीतील हनुमानगढी पर्यटन विकासाला मान्यता; १२१ कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांची हिरवी झेंडी | Hanumangadhi Amravati Tourism Development Project

शेअर करा :

Hanumangadhi Amravati Tourism Development Project : अमरावती शहरालगत असलेल्या हनुमानगढी परिसराच्या पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून परिसर विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले.

Hanumangadhi Amravati Tourism Development Project

अमरावती : अमरावती शहरालगत असलेल्या हनुमानगढी परिसराच्या पर्यटन विकासासाठी १२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हनुमानगढी परिसराला धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

🔗अमरावतीसह परिसरातील बातम्या वाचा – विदर्भ

बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनुमानगढी परिसरातील पर्यटन विकासाची कामे टप्प्याटप्प्याने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात तसेच या परिसराचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण परिसराचे उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून रूपांतर करण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

Hanumangadhi Amravati Tourism Development Project

याच बैठकीत नागपूर शहरातील महाल परिसरातील पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्तावही चर्चेला आला. नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराच्या विकासकामांदरम्यान पार्किंगची सोय अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगत, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनतळाची व्यवस्था उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

🔗महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा – महाराष्ट्र

या बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे उपस्थित होते.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको