mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेस आक्रमक; देशभर किसान संमेलनांची घोषणा | India US Trade Deal Protest

शेअर करा :

India US Trade Deal Protest : भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून भोपाळ व यवतमाळसह देशभर किसान संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी सहभागी होणार.

India US Trade Deal Protest

नवी दिल्ली : भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलनाची भूमिका घेत किसान संमेलनांच्या मालिकेची घोषणा केली आहे. या अंतर्गत मध्य प्रदेशातील भोपाळ येथे 24 फेब्रुवारी रोजी तर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे 7 मार्च रोजी किसान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

👉 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वाचा – राजकारण

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यात आली. बैठकीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्यसभा खासदार रजनी पाटील तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षाचे नेते उपस्थित होते.

व्यापार कराराचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार : काँग्रेस

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, भारत-अमेरिका व्यापार कराराचा परिणाम सहा राज्यांतील कापूस, सोयाबीन, मका उत्पादक शेतकरी तसेच फळे व काजू उत्पादकांवर होण्याची शक्यता आहे.

👉 देशभरातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा – भारत

या पार्श्वभूमीवर किसान संमेलनांच्या माध्यमातून शेतकरी संघटनांसह देशभर आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कार्यक्रमांमध्ये खर्गे आणि राहुल गांधी सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारवर टीका

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी या व्यापार करारावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्याचा आरोप केला. या करारामुळे देशातील शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल, असा दावा काँग्रेसने केला आहे.

‘सरकारकडून विश्वासघात’ — हर्षवर्धन सपकाळ

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर टीका करत भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याची मागणी केली. तसेच मनरेगा योजना पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधानांनी देशाशी विश्वासघात केला असून हा निर्णय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा व अर्थव्यवस्थेला धक्का देणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. या विरोधात जनतेत व्यापक आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचेही सपकाळ यांनी नमूद केले.  एकूणच, भारत-अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत देशभर किसान संमेलनांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको