India vs USA T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या 84 धावांच्या खेळीमुळे भारताचा विजय.


मुंबई : भारताने टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी बाद 162 धावा केल्या.


टीम इंडियाचे पहिले चार गडी अवघ्या 46 धावांत बाद झाले होते. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी 49 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.


161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने 8 गडी गमावून 132 धावा केल्या. त्यामुळे भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार सूर्यकुमार यादव. एकीकडे विकेट्स पडत असताना शेवटपर्यंत उभा राहून त्यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


