mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Jalna News: जालन्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा नागरिकांवर हल्ला; १५ जण जखमी,दोघांची प्रकृती गंभीर

शेअर करा :

Jalna News: जालना शहरात गुरुवारी नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले अतसाना अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याचे चावा घेत्याचा धक्कादायक प्रकार समोल आला आहे.  या हल्ल्यात १० ते १५ नागरिक जखमी झाले असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jalna News

जालना : जालना शहरात गुरुवारी नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले अतसाना अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याचे चावा घेत्याचा धक्कादायक प्रकार समोल आला आहे.  या हल्ल्यात १० ते १५ नागरिक जखमी झाले असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सरस्वती भुवन परिसर, शनी मंदिर परिसर तसेच काली मज्जिद परिसरात मतदानासाठी जात असलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. एका मागोमाग एक नागरिकांना चावा घेत या कुत्र्याने परिसरात दहशत निर्माण केली. काही जणांच्या पायांना गंभीर जखमा झाल्या असून एका जणाच्या हाताच्या करंगळीला इजा झाली आहे.
या घटनेनंतर जखमी नागरिकांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष देवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांनाही कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती असून, रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहरात वाढलेल्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तात्काळ या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको