mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

राज्यात ७० हजार पदांची मेगाभरती! | नव्या पद्धतीने होणार नोकरभरती – मुख्यमंत्री फडणवीस | Maharashtra government recruitment 70000 posts

शेअर करा :

Maharashtra government recruitment 70000 posts : महाराष्ट्रात लवकरच ७० हजारांहून अधिक शासकीय पदांची भरती होणार आहे. MPSC व आयोगाबाहेरील पदांसाठी पारदर्शक, डिजिटल व नव्या पद्धतीने नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra government recruitment 70000 posts

 

मुंबई : राज्यात लवकरच नोकरभरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार असून जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे २० हजार पदे, तसेच लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचाही समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.

राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबविण्यात याव्यात. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नसून शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये ७० हजार पदे भरल्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने सादर केलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासन सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल, असे त्यांनी नमूद केले.

यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डिजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह, स्वच्छ आणि वेगवान असणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. येत्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाचे मुद्दे

  • एकूण भरती : ७०,०००+ पदे
  • MPSC मार्फत : सुमारे २०,००० पदे
  • भरती पद्धत : नवीन, पारदर्शक व डिजिटल प्रणाली
  • व्हेरिफिकेशन : ऑनलाईन, डिजीलॉकर, ब्लॉकचेन आधारित
  • निर्णय : सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा
  • अंतिम मंजुरी : मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच

🔗 👉 महाराष्ट्रातील सरकारी नोकरभरती, प्रशासन निर्णय आणि राजकीय घडामोडींच्या ताज्या बातम्यांसाठी महालोकवार्ताच्या ‘महाराष्ट्र’ आणि ‘राजकारण’ विभागाला भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको