mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Malkapur Leopard Attack: मलकापूर तालुक्यातील निमखेड शिवारात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; गंभीर जखमी

शेअर करा :

Malkapur Leopard Attack: मलकापूर तालुक्यातील निमखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला असून बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Malkapur Leopard Attack

मलकापूर :  जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्षाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, मलकापूर तालुक्यातील निमखेड शिवारात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना 19 जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

पिंपळखुटा बुद्रुक येथील रहिवासी नितीन सुरेश मालठाणे हे 19 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निमखेड शिवारात शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात नितीन मालठाणे गंभीर जखमी झाले.

आरडाओरड ऐकून शेजारील शेतातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. या हल्ल्यात नितीन मालठाणे यांच्या कमरेला व पायाला गंभीर दुखापत झाली असून बिबट्याचा एक दात त्यांच्या पायात तुटून रुतल्याचेही आढळून आले आहे.

जखमी अवस्थेत नितीन मालठाणे यांना तातडीने बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मोताळा वन्यजीव विभागाच्या पथकाने निमखेड शिवारात धाव घेत बिबट्याचा शोध सुरू केला आहे. परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको