mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

मुंबईत भारतातील पहिला संगीतमय रस्ता सुरू; कोस्टल रोडवर ‘जय हो’ची धून|Mumbai Musical Road

शेअर करा :

Mumbai Musical Road : धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गावर भारतातील पहिला संगीतमय रस्ता सुरू. ५०० मीटर विशेष पट्ट्यांमुळे वाहन ६०–७० किमी वेगाने धावताना ‘जय हो’ची धून ऐकू येणार.

Mumbai Musical Road

 

मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता (कोस्टल रोड) आता देशातील पहिला ‘संगीतमय रस्ता’ म्हणून ओळखला जाणार आहे. मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणाऱ्या या मार्गाला आता नवे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.

या संगीतमय रस्त्याचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डनजवळ करण्यात आले. उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वाहन विशेष संगीतमय पट्ट्यांवरून धावले असता, ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील लोकप्रिय ‘जय हो’ गाण्याची धून ऐकू आली. त्या वेळी वाहनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे तसेच हंगेरी देशाचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी उपस्थित होते.

Mumbai Musical Road

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सागरी किनारी मार्गाच्या उजव्या मार्गिकेवर प्रवास करताना वाहनचालकांना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेता येणार आहे. हंगेरियन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अभिनव संकल्पना साकारण्यात आली आहे. वाहन ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने धावत असताना रस्त्यावर बसवलेल्या विशेष पट्ट्यांमुळे ‘जय हो’ या जगप्रसिद्ध गाण्याची धून वाहनात ऐकू येते.

पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० मीटर लांबीच्या विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत. मरीन ड्राइव्हवरील बोगदा संपल्यानंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना या संगीतमय रस्त्याची सुरुवात होते.

थोडक्यात – संगीतमय रस्ता

भारतातील पहिला ‘संगीतमय रस्ता’

धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गावर प्रकल्प

पहिल्या टप्प्यात ५०० मीटर लांबीच्या विशेष पट्ट्या

६०–७० किमी वेगाने वाहन गेल्यास स्वरांची निर्मिती

कोणत्याही अतिरिक्त उपकरणाशिवाय वाहनात ‘जय हो’ची धून ऐकू येणार

🔗 मुंबईसह महाराष्ट्रातील ताज्या राजकीय आणि विकासाशी संबंधित घडामोडींसाठी 👉 महाराष्ट्र विभाग या कॅटेगरीला अवश्य भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको