Ravindra Padvi National Boxing Championship : बेंगलुरु येथे पार पडलेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये क्रीडा प्रबोधिनी अकोल्याच्या रवींद्र पाडवीने 49-52 किलो गटात सुवर्णपदक जिंकत देशात प्रथम क्रमांक मिळवला.
49 ते 52 किलो वजनगटात सुवर्ण कामगिरी
बंगळूरू : स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन (प्री युनिव्हर्सिटी) बंगळूरू तसेच डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन (प्री युनिव्हर्सिटी) बंगळूरू नॉर्थ डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 69 वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप दि. 04 ते 09 फेब्रुवारी 2026 दरम्यान बेंगलुरु येथे पार पडली. या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी अकोल्याचा खेळाडू रवींद्र पाडवी याने उत्कृष्ट कामगिरी करत देशात प्रथम क्रमांक पटकावला.
बेंगलुरु, कर्नाटक येथे संपन्न झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत रवींद्र पाडवी याने 49 ते 52 किलो वजनगटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे अकोला जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रवींद्र पाडवी याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्व प्रशिक्षण शिबिरातही सहभाग घेतला असून त्याला जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक मा. सतीशचंद्र भट्ट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्याच्या या यशाबद्दल अकोला जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
— प्रतिनिधी | महालोकवार्ता
🔗 क्रीडा क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्रीडा कॅटेगरीला भेट द्या.
🔗 अकोल्यातील ताजा घडामोडींसाठी विदर्भ कॅटेगरीला भेट द्या.