mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू| Sharad Pawar health update

शेअर करा :

Sharad Pawar health update: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.

Sharad Pawar health update

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडली. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शरद पवार बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी पोहोचली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा डॉक्टरांची टीम गोविंदबाग येथे तपासणीसाठी गेली. तपासणीनंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉल रुग्णालयात दाखल होताना ते कारमधून उतरून व्हीलचेअरच्या सहाय्याने रुग्णालयात गेले. दरम्यान, शरद पवार यांच्या तपासणीचे अहवाल समोर आले असून सध्या त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

🔗 👉 महाराष्ट्रातील राजकारणातील ताज्या घडामोडी व नेत्यांशी संबंधित अपडेट्ससाठी महालोकवार्ताच्या ‘महाराष्ट्र’ आणि ‘राजकारण’ विभागाला भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको