mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

SRTMU संशोधकांनी विकसित केले Toxic Gas Monitoring Wearable Device; भारत सरकारकडून डिझाईन पेटंट

शेअर करा :

Toxic Gas Monitoring Wearable Device : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. राजाराम माने व संशोधन टीमने विकसित केलेले Toxic Gas Monitoring Wearable Device ला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट प्राप्त. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेसाठी हे उपकरण महत्त्वपूर्ण ठरणार.

Toxic Gas Monitoring Wearable Device

नांदेड :  औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे ‘टॉक्सिक गॅस मॉनिटरिंग वेअरेबल डिव्हाइस’ (Toxic Gas Monitoring Wearable Device) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. या उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत डिझाईन पेटंट नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

👉 बीड जिल्ह्यासह परिसरातील ताज्या बातम्या वाचा : महाराष्ट्र

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन टीमने हे अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. औद्योगिक वसाहती, रासायनिक प्रयोगशाळा तसेच धोकादायक वातावरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे उपकरण विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. राजाराम माने
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. राजाराम माने

कामाच्या ठिकाणी विषारी वायूंची पातळी अचानक वाढल्यास हे वेअरेबल डिव्हाइस त्वरित इशारा (अलर्ट) देईल. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होऊन कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हे उपकरण ‘स्मार्ट सुरक्षा कवच’ ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

या संशोधन प्रकल्पात प्रा. डॉ. राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अविनाश गायकवाड, ऋषिकेश सूर्यवंशी, विजयपाल वाधवे, प्रतीक राऊत, तेजश्री साठे यांच्यासह डॉ. रुपेश मुद्देवाड, डॉ. रवी कवळे, डॉ. संतोष जाधव आणि डॉ. श्याम गोरे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

👉 देशातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : भारत

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी संशोधन टीमचे अभिनंदन केले. तसेच अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह विद्यापीठातील विविध संकुलांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संशोधकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको