mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Washim News: मालेगाव नगरपंचायत उपाध्यक्षपदी राधा खवले : शिवसेना–भाजप युतीचा विजय

शेअर करा :

Washim News: नगरपंचायत उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार, १२ जानेवारी रोजी नगरपंचायत भवनात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी पंकज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)–भाजप युतीकडून शिंदेसेनेच्या उमेदवार राधा महादेव खवले (प्रभाग क्रमांक ११) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Washim News
मालेगाव : नगरपंचायत उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार, १२ जानेवारी रोजी नगरपंचायत भवनात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी पंकज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)–भाजप युतीकडून शिंदेसेनेच्या उमेदवार राधा महादेव खवले (प्रभाग क्रमांक ११) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेना–भाजप युतीकडून राधा खवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या नगरसेविका शेख सलीमाबी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांच्या उपस्थितीत हात वर करून मतदान घेण्यात आले. या मतदानात राधा खवले यांना ११ मते, तर शेख सलीमाबी यांना ६ मते मिळाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राधा खवले यांना विजयी घोषित केले. मालेगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच मराठा पाटील समाजाच्या उमेदवाराला उपाध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विजयाचा महायुतीला राजकीय लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीदरम्यान आमदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाध्यक्ष महादेवराव ठाकरे, युवासेना अध्यक्ष प्रदीप पाटील मोरे, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील कुटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व शिवसेना–भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वीकृत नगरसेवक पदी पराभूत उमेदवारांना संधी

नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदांसाठी इच्छुकांमध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. संख्याबळानुसार शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेसला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडण्याची संधी मिळाली. या निवडीसाठी काँग्रेसचे आमदार अमित झनक तसेच शिवसेना (शिंदे गट)च्या आमदार भावना गवळी यांची भूमिका निर्णायक ठरली. या प्रक्रियेत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार गणेश अहिर, तर शिवसेना (शिंदे गट)कडून माजी नगरसेवक गजानन सारस्कर यांनी स्वीकृत नगरसेवकपदी बाजी मारली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको