mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

यवतमाळ जिल्ह्यात ट्रॅव्हल्स अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन | जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश | Yavatmal travels safety action plan

शेअर करा :

Yavatmal travels safety action plan : यवतमाळ जिल्ह्यात ट्रॅव्हल्स वाहनांना आग लागून होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन जाहीर; वाहन तपासणी, सुरक्षा उपाय आणि चालकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी.

Yavatmal travels safety action plan

यवतमाळ : जिल्ह्यात ट्रॅव्हल्स वाहनांना आग लागून होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना मार्गदर्शक सूचनांचे पत्र जारी केले आहे.

यापूर्वी आग लागून झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सर्व ट्रॅव्हल्स मालकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Yavatmal travels safety action plan

जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार:

१) प्रत्येक ट्रॅव्हल्स वाहनाची दर पंधरा दिवसांनी तांत्रिक तज्ज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक राहील.

२) वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

३) लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी द्रुतगती मार्गांवर दोन चालक नियुक्त करणे बंधनकारक राहील, जेणेकरून आळीपाळीने वाहन चालवता येईल.

४) चालक, वाहक आणि सफाई कर्मचाऱ्यांची महिन्यातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणे आवश्यक राहील.

५) परिवहन विभागाने निश्चित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

६) अपघाताच्या वेळी प्रवाशांना तात्काळ बाहेर पडता यावे यासाठी संकटकालीन खिडकी दर्शक फलक लावणे आवश्यक राहील.

७) ट्रॅव्हल्स वाहनांमध्ये अग्निशमन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक Fire Extinguisher ठेवणे तसेच चालक व वाहकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व ट्रॅव्हल्स मालकांनी वरील निर्देशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

— प्रतिनिधी | महालोकवार्ता

🔗 यवतमाळसह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी 👉 विदर्भ या कॅटेगरीला अवश्य भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको