mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

जालना : गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; सिलिंडर हातात घेऊन मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी | Jalna Gas Price Protest

शेअर करा :

Jalna Gas Price Protest : जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात काँग्रेस पक्षाने घरगुती व व्यावसायिक गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी सिलिंडर हातात घेऊन घोषणाबाजी करत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

Jalna Gas Price Protest
जालना : घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ जालना शहरात काँग्रेस पक्षाने गुरुवार, 12 मार्च रोजी आक्रमक आंदोलन केले. नूतन वसाहत परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलिंडर घेऊन केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. काही काळ या परिसरात आंदोलनामुळे वातावरण तापले होते.

Jalna Gas Price Protest

अलीकडेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य नागरिक, गृहिणी तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यावर होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे इंधन दरांवर परिणाम होत असला तरी त्याचा थेट आर्थिक बोजा सामान्य नागरिकांवर टाकणे अन्यायकारक असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

आंदोलनादरम्यान “गॅस दरवाढ कमी करा”, “महागाई रोखा” अशा घोषणा देत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गॅस सिलिंडरच्या वाढीव किमती तात्काळ कमी कराव्यात तसेच घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, गॅस दरवाढ मागे घेतली नाही तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष बदर चाऊस, सेवादल जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको