mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Akola Minor Girl Assault Case Rohit Pawar | अकोला जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; रोहित पवारांची पीडित कुटुंबीयांना भेट

शेअर करा :

Akola Minor Girl Assault Case Rohit Pawar : चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात दहावर्षीय अल्पवयीन मुलीवर ६० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवार ७ मे रोजी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. चिमुकलीवरील अत्याचाराची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात व्हावी, तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या प्रसंगी राहित पवार यांनी केली.

Akola Minor Girl Assault Case Rohit Pawar

दिग्रस बू (जि. अकोला) : जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत एका वागात दहावर्षीय अल्पवयीन मुलीवर ६० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पीडित मुलीच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवार ७ मे रोजी घटनास्थळी भेट दिली. या प्रसंगी रोहित पवार यांनी “मुलीला न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन लढा देणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

👉 हे देखील वाचा : समृद्धी महामार्ग दरोडा उलगडला : बीडमधून आंतरराज्य टोळी जेरबंद, ८ आरोपी अटकेत

चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात दहावर्षीय अल्पवयीन मुलीवर ६० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवार ७ मे रोजी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. चिमुकलीवरील अत्याचाराची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात व्हावी, तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या प्रसंगी राहित पवार यांनी केली.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर ही घटना कोणाला सांगितल्यास आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार मंगळवार ५ मे रोजी उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. राज्यभरात या घटनेचे पडसाद दिसून येत आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी गुरुवार ७ मे रोजी घटनास्थळी जावून पीडित मुलीच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी आरोपीविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली. या प्रसंगी आमदार नितीन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शंकर शेळके, ठाणेदार रवींद्र लांडे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

राजकीय वातावरण तापले

रोहित पवार यांच्या या भेटीनंतर परिसरातील राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांकडून राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावातील महिलांनीही संताप व्यक्त करत “राज्यात मुली सुरक्षित नसतील तर मुलींना जन्माला घालणेच कठीण होईल,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.

👉 हे देखील वाचा : महाराष्ट्राची नवीन कामगार नियमावली मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवता येणार

पवार यांनी स्विकारली पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी

या भेटी दरम्यान आमदार रोहित पवार यांनी पीडित मुलीशी संवाद साधला. या प्रसंगी ती शिक्षणात हुशार असल्याचे सांगत त्यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्विकारणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय, या घटनेचा निषेध व्यक्त करत त्यांनी राज्यभरात वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

— प्रतिनिधी महालोकवार्ता 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको