Akola hottest city in world heatwave Maharashtra : अकोल्यात 44°C तापमानाची नोंद होऊन जगात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले. विदर्भात हीटवेव्हचा इशारा कायम असून राज्य सरकारने उष्णतेसाठी विशेष SOP जाहीर केले आहेत.


अकोला : विदर्भात उष्णतेचा प्रचंड तडाखा कायम असून, अकोला शहराने तापमानाच्या बाबतीत नवा उच्चांक गाठला आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, अकोल्यात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हे शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. त्यामुळे विदर्भातील उष्णतेची तीव्रता अधिकच वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
👉 हे देखील वाचा : करवंड महोत्सव 2026: शिवराय-गुणवंताबाई विवाह स्मृतीनिमित्त भव्य ऐतिहासिक सोहळा
अकोला शहराने ४४ अंश तापमानासह जागतिक स्तरावर दुसरे स्थान मिळवल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्य शासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असल्या, तरी पुढील काही दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
विदर्भात उष्णतेचा कहर
विदर्भातील इतर शहरांमध्येही तापमान उच्च पातळीवर कायम आहे:
अकोला – ४४°C
अमरावती – ४३.८°C
वर्धा – ४३.५°C
नागपूर – ४२.२°C
चंद्रपूर – ४२.२°C
गडचिरोली – ४२.६°C
यवतमाळ – ४२.६°C
हीटवेव्हचा इशारा कायम
भारतीय हवामान विभागाने (IMD) १३ ते १७ एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवला आहे. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्य सरकारचा अॅक्शन मोड: तीन महत्त्वाच्या SOP जाहीर
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उष्णता कृती आराखड्यांतर्गत तीन व्यापक मानक कार्यपद्धती (SOP) जाहीर केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या उपाययोजनांमुळे उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यू कमी करण्यास मदत होणार आहे.
👉 हे देखील वाचा : मान्सून २०२६ अंदाज: देशात ९२ टक्के पावसाची शक्यता; एल निनोचा परिणाम कमी
कामगारांसाठी विशेष उपाययोजना
पहिल्या SOP अंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, डिलिव्हरी कर्मचारी, रिक्षाचालक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी विशेष उपाय सुचवले आहेत. याअंतर्गत…
कामाचे वेळापत्रक बदल
पाणी ब्रेक आणि पाणी बूथ
ORS वितरण
सावलीची व्यवस्था
खाण कामगारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे
चंद्रपूरमधील कोळसा खाणींतील कामगारांसाठी:
थंड विश्रांती केंद्रे
पाणी व वायुवीजन व्यवस्था
जॉब रोटेशन
उष्णता आजार ओळख प्रशिक्षण
उष्णता-प्रतिरोधक घरांवर भर
तिसऱ्या SOP मध्ये:
कूल रूफ तंत्रज्ञान
हरित क्षेत्रे (Green Spaces)
हवामानानुसार गृहनिर्माण नियोजन
यावर भर देण्यात आला आहे.
१५ जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष
उच्च-जोखमीच्या जिल्ह्यांमध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जळगाव, नंदुरबार, धुळे, नांदेड, लातूर या भागांमध्ये विशेष उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.
👉 राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र
प्रशासनाची नागरिकांना सूचना
सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान बाहेर पडणे टाळा
भरपूर पाणी प्या
उन्हात श्रमाची कामे टाळा
लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या
आरोग्य तज्ज्ञांचा इशारा
डोकेदुखी, चक्कर, अशक्तपणा, जास्त घाम येणे ही हीट स्ट्रोकची लक्षणे असू शकतात.
तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


