mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

मेहकरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सहाय्यक महसूल अधिकारी २० हजारांसह रंगेहात | Mehkar ACB trap

शेअर करा :

Mehkar ACB trap : मेहकर उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी कैलास मुरकुट यांना एसीबीने २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई सुरू.

Mehkar ACB trap
मेहकर (जि.बुलढाणा) : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत सहाय्यक महसूल अधिकारी कैलास मुरकुट यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

👉 हे देखील वाचा : अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सक्तीच्या रजेवर

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कैलास मुरकुट हे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर येथे सहाय्यक महसूल अधिकारी तथा प्रस्तुतकार- १ म्हणून कार्यरत असून ते बालाजी नगर, प्लॉट क्रमांक ४९ येथे वास्तव्यास आहेत. तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून, त्यांच्या पक्षकाराच्या (चुलत आजोबा) जमिनीच्या फेरफार रद्द प्रकरणात त्यांनी वकीलपत्र घेतले होते.
या प्रकरणात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम आदेश झाला होता. मात्र त्या आदेशाची मूळ नक्कल प्रत आरोपीकडेच असल्याने तक्रारदाराने ती मागितली. यावेळी आरोपी मुरकुट यांनी ती प्रत देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबी वाशीमकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपीने पुन्हा २० हजार रुपयांची मागणी करत रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षात सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कैलास मुरकुट यांना रंगेहात पकडले.

👉 बुलढाण्यासह परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांनी कारवाईचे नेतृत्व केले. त्यांना पोहेकॉ नितीन टवलारकर, योगेश खोटे आणि चालक पोकों मंगेश देवकाते यांनी सहकार्य केले.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 गुन्हे जगतातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : गुन्हे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको