mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Washim Crime: जमीन नावे करण्यासाठी लाच; ग्राम महसूल अधिकारी जाळ्यात

शेअर करा :

Washim Crime:  शेतजमीन नावे करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांनी यशस्वी सापळा रचत ग्राम महसूल अधिकारी रविंद्र रंगनाथ खुळे (वय ४९) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई १५ जानेवारी रोजी करण्यात आली.

Washim Crime

मंगरुळपीर : शेतजमीन नावे करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांनी यशस्वी सापळा रचत ग्राम महसूल अधिकारी रविंद्र रंगनाथ खुळे (वय ४९) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई १५ जानेवारी रोजी करण्यात आली.
तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली शेतजमीन तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी आरोपी ग्राम महसूल अधिकाऱ्याने पंचासमक्ष १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. यामधील पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले.
सापळा कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत लाचेची रक्कम १० हजार रुपये, त्याच्यासोबत असलेले २ हजार ७६० रुपये रोख व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईल जप्तीचा पंचनामा सुरू असून, आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक अलका गायकवाड (ला.प्र.वि., वाशिम) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईवर पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी (ला.प्र.वि., वाशिम) यांनी पर्यवेक्षण केले असून या सापळा पथकात पो.हवा. नितीन टवलारकर, विनोद अवगळे, योगेश खोटे, पो.शि. महेश परमेश्वरे, चापोशि नाविद शेख, मंगेश देवकते यांचा समावेश होता. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम येथील पोलिस उपअधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको