mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Municipal elections: राज्यातील १५,९०८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद

शेअर करा :

Municipal elections:  राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २ हजार ८६९ जागांसाठी 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानात १५ हजार ९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Municipal elections

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २ हजार ८६९ जागांसाठी 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानात १५ हजार ९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी उत्साहासह तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. मुंबईत बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या घटनांमुळे खळबळ उडाली, तर पैसे वाटपाचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नागपुरात काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयाला आग लागली, तर धुळ्यात ईव्हीएमची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी मतदानाचा धुरळा उडाला. एकूण १५,९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्याचा हा प्रश्न आहे. आता १६ जानेवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान, राज्यभरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या देखील घटना घडल्या. त्यामुळे ज्या ठिकाणी मतदानाला उशिरा सुरुवात झाली, त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई (इन्क) सहजासहजी पुसली जात असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे. शाई जर पुसली जात असेल, तर पारदर्शक मतदानावर प्रश्नचिन्ह उभे राहते, असे म्हणत त्यांनी यावर आक्षेप घेतला. राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ भूमिका स्पष्ट केली आहे.

अनेक ठिकाणी गोंधळ अऩ तणाव

मतदानाच्या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी उत्साहासह तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. मुंबईत बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या घटनांमुळे खळबळ उडाली, तर पैसे वाटपाचेही व्हिडिओ व्हायरल झाले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको