mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Mahapalika Mayor Reservation : महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला; नगरविकास विभागाचे पत्र जाहीर

शेअर करा :

Mahapalika Mayor Reservation : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी होणार आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे.

Mahapalika Mayor Reservation

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिकांतील महापौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत नगरविकास विभागाने अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार, सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे.

या सोडतीनंतर कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर निवडला जाणार, हे निश्चित होणार आहे. नगरविकास विभागाकडून ही आरक्षण सोडत मंत्रालयात पार पाडली जाणार आहे.

राज्यमंत्री (नगरविकास) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृह, सहावा मजला येथे ही सोडत प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी, अशी विनंती नगरविकास विभागाच्या पत्रकात करण्यात आली आहे.

दरम्यान, महापौरपदाच्या आरक्षणासाठी लागू असलेल्या रोटेशन पद्धतीत बदल करण्याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नव्या नियमांनुसार आरक्षणाची चक्राकार पद्धत पुन्हा ओपन प्रवर्गापासून सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते. समाजातील सर्व घटकांना महापौरपदाची संधी मिळावी, हा या पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. सध्या कायद्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि ओबीसी प्रवर्गांसाठी रोटेशननुसार आरक्षण लागू आहे. मात्र, नियमांमध्ये संभाव्य बदल झाल्यास ही चक्राकार प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको