mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Chhatrapati Sambhajinagar News: शॉटसर्कीटमुळे घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

शेअर करा :

Chhatrapati Sambhajinagar News: येथील न्यु नंदनवन कॉलनी परिसरातील चाँदमिरी मस्जिद परिसरातील एका घराला शॉर्टसर्कीटने आग लागल्याची घटना रविवार ११ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगर : येथील न्यु नंदनवन कॉलनी परिसरातील चाँदमिरी मस्जिद परिसरातील एका घराला शॉर्टसर्कीटने आग लागल्याची घटना रविवार ११ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, न्यु नंदनवन कॉलनी परिसरातील चाँदमिरी मस्जिद जवळ असलेल्या एका घरात शॉर्टसर्कीट होवून रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती शेख नवीद यांनी पद्मपुरा अग्निशमन दलाला आणि छावणी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपअग्निशमन अधिकारी विनायक कदम, डयुटी अधिकारी कुलकर्णी, अग्निशामक जवान सुरज राठोड, अक्षय नागरे, अजिंक्य भगत, मतीन, विनोद बमने, सचिन फुले, एन.आर. घुगे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तो पर्यंत घरातील फर्निचर, एलईडी टीव्ही व इतर गृहउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको