mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

fifth-industrial-revolution-roi-ai : पाचव्या औद्योगिक क्रांतीचे अर्थशास्त्र ROIवर आधारित असेल : अश्विनी वैष्णव

शेअर करा :

fifth-industrial-revolution-roi-ai : पाचव्या औद्योगिक क्रांतीत कमी खर्चात अधिक परतावा मिळविणे महत्त्वाचे असून एआय-आधारित उपायांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दावोस येथे सांगितले.

fifth-industrial-revolution-roi-ai

दावोस : पाचव्या औद्योगिक क्रांतीचे अर्थशास्त्र हे गुंतवणुकीवरील परतावा (ROI) यावर आधारित असेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितले. त्यांनी भारताच्या एआय-आधारित सेवा क्षेत्रातील क्षमतेवर भाष्य करताना हे मत व्यक्त केले.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, या पाचव्या औद्योगिक क्रांतीमधील अर्थकारण हे कमी खर्चात अधिकाधिक परतावा मिळविण्यावर आधारित असेल. जर एखाद्याकडे ५० अब्ज पॅरामिटर असलेले मॉडेल असेल, तर ते एका जीपीयूवर सहजपणे तैनात करता येते. तसेच, ३० अब्ज पॅरामिटरचे मॉडेल हे सुमारे 80 टक्के कामासाठी पूर्णपणे उपयुक्त ठरते आणि अशा मॉडेलसाठी जीपीयूचीही आवश्यकता नसते.

भारत एआय-आधारित उपाययोजनांमध्ये सेवा क्षेत्रासाठी सक्षम असून, कमी खर्चात प्रभावी उपाय उपलब्ध करून देण्याची क्षमता भारताकडे आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको