mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Jammu Kashmir Accident: दोडा येथे भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद

शेअर करा :

Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील भादरवाह परिसरात भारतीय सैन्याचे वाहन 400 फूट खोल दरीत कोसळून 10 जवान शहीद झाले. अनेक जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Jammu Kashmir Accident:

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील भादरवाह परिसरात भारतीय सैन्याचे वाहन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळून 10 जवान शहीद झाले आहेत. या भीषण अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जवानांना घेऊन जाणारी भारतीय लष्कराची बुलेटप्रूफ गाडी उंचावरील पोस्टकडे जात होती. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन खोल दरीत कोसळले.

Jammu Kashmir Accident:

या घटनेची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही पोलिस व रेस्क्यू टीमला मदत केली. बचावकार्यादरम्यान 10 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमी जवानांनाही दरीतून बाहेर काढण्यात आले आहे.

जखमी जवानांची प्रकृती गंभीर असून त्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उधमपूर येथील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. लष्कराच्या माहितीनुसार, या अपघाताची चौकशी सुरू असून जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार देण्यात येत आहेत. या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी : उपराज्यपाल

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, या दुर्घटनेमुळे मला अतिशय वेदना झाल्या आहेत. या कठीण काळात संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे. जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असेही उपराज्यपालांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको