mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

अकोला महापालिकेत भाजपचा झेंडा; शारदा खेडकर महापौर, अमोल गोगे उपमहापौर | Akola Municipal Corporation Election Result

शेअर करा :

Akola Municipal Corporation Election Result : अकोला महापालिकेत भाजपने सत्ता स्थापन केली असून शारदा खेडकर महापौर तर अमोल गोगे उपमहापौरपदी निवडून आले. काँग्रेस, वंचितला मोठा धक्का.

Akola Municipal Corporation Election Result

अकोला : अकोला महानगरपालिकेत शुक्रवारी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार शारदा रणजीत खेडकर यांनी महापौरपदावर विजय मिळवला, तर अमोल सुधाकर गोगे उपमहापौरपदी निवडून आले. शहर सुधार समितीच्या मतदानात भाजप उमेदवारांना ४५ मते मिळाली, तर ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांना महाविकास आघाडीची ३२ मते मिळाली.

महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी ही निवडणूक पार पडली. यावेळी सभेच्या पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, नगर सचिव अमोल डोईफोडे, सभेचे गणना अधिकारी मनपा उपायुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव तसेच निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Akola Municipal Corporation Election Result

या निवडणुकीत भाजपचे अपक्ष बंडखोर नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी अखेर भाजपलाच मतदान केले, तर एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले. महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत असतानाच अखेर अकोला महापालिकेवर भाजपचाच महापौर निश्चित झाला.

सत्ता स्थापनेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने मतदान करत शहराच्या विकासासाठी एकत्र जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. यामुळे भाजपचे सभागृहातील बहुमत स्पष्ट झाले.

महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांच्या शहर सुधार समितीने शारदा खेडकर व अमोल गोगे यांच्या बाजूने मतदान केले, तर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व इतर विरोधी पक्षांनी सुरेखा काळे यांना पाठिंबा दिला. मात्र, एमआयएमच्या प्रभाग क्रमांक २-अ मधील सीमा अंजुम शेख अनीस, प्रभाग क्रमांक २-क मधील मैमूना बी. अब्दुल रशीद आणि प्रभाग क्रमांक २-ड मधील सै. रहीम सै. हाशम या तीन नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्याने निकालावर मोठा परिणाम झाला.

एकूणच भाजपच्या या विजयामुळे अकोल्यात काँग्रेस आणि वंचितला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौरपदावर विजय मिळूनही शासकीय शोककालावधीमुळे भाजपच्या शहर सुधार समितीने कोणताही जल्लोष टाळला. शोकाकूल वातावरणात हा विजय साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एमआयएम नगरसेवकांवर फेकल्या बांगड्या

महापौर निवडीनंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड होताच काँग्रेस व एमआयएम नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला. तटस्थ भूमिकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकांवर बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद वाढला. या प्रकारामुळे काही काळ महापालिका परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

महापौर निवडणूक निकाल

महापौर : शारदा खेडकर (भाजप)

उपमहापौर : अमोल गोगे (भाजप)

भाजप व मित्र पक्ष : ४५ मते

महाविकास आघाडी : ३२ मते

एमआयएम : ३ नगरसेवक तटस्थ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको