mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

मोदी–ट्रम्प चर्चा: रशियन तेल खरेदी थांबवणार? | India US Tariff Cut News

शेअर करा :

India US Tariff Cut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील फोन चर्चेनंतर भारत रशियन तेल खरेदी थांबवण्यास तयार असल्याचा ट्रम्प यांचा दावा. India US Trade Deal, Tariff 25% to 18% ताज्या घडामोडी.

India US Tariff Cut News
(फोटो संग्रहित)

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज फोनवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारत आता अमेरिका आणि प्रामुख्याने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे रशिया–युक्रेन युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांना मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावरील परस्पर शुल्क (Reciprocal Tariff) 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे हे माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे सांगत ट्रम्प म्हणाले की, नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असून ते भारतातील ताकदवान आणि सन्माननीय नेते आहेत. या चर्चेत व्यापार, तसेच रशिया–युक्रेन युद्ध संपवण्यासंबंधी सविस्तर चर्चा झाली.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली असून भारत अमेरिका आणि विशेषतः व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करेल. यामुळे युक्रेनमधील युद्ध संपवण्यास मदत होईल. सध्या सुरू असलेल्या या युद्धात दर आठवड्याला हजारो लोकांचा मृत्यू होत असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.

भारत–अमेरिका व्यापार करारावर सहमती

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारावर सहमती झाल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या करारामुळे अमेरिकेने भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला असून तो 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्यात येत आहे. पुढील काळात भारतही त्यांच्या बाजूने टॅरिफ कमी करण्याचे प्रयत्न करेल, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. अमेरिका–भारत व्यापारात टॅरिफ अडथळा येऊ नये, यासाठी झिरो टॅरिफच्या दिशेने वाटचाल होईल, असेही त्यांनी सूचित केले.

500 अब्ज डॉलरची अतिरिक्त खरेदी

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका कडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास कटिबद्ध आहेत. यामध्ये 500 अब्ज डॉलर्सची अतिरिक्त खरेदी होणार असून त्यात अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादने, कोळसा आणि इतर वस्तूंचा समावेश असेल. यामुळे भारत–अमेरिका संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

टॅरिफवर संभ्रम कायम

दरम्यान, भारतावरील टॅरिफबाबत संभ्रम कायम आहे. यापूर्वी अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लादला होता. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी सुरू असल्यामुळे अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्यात आला होता. आता ट्रम्प यांनी टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याची घोषणा केल्यामुळे भारतावर नेमका किती टॅरिफ लागू राहील, याबाबत स्पष्टता मिळणे अद्याप बाकी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको