mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

टेंभुर्णीत हनुमान मंदिरात चोरी; दानपेटी फोडून ५ हजार लंपास | Tembhurni temple theft

शेअर करा :

Tembhurni temple theft : टेंभुर्णीतील हनुमान मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी ५ हजार रुपये लंपास केले. पहाटे उघडकीस आलेली घटना; पोलिसांत तक्रार दाखल.

tembhurni-temple-theft-donation-box

टेंभुर्णी  : टेंभुर्णी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी पेटीतील सुमारे पाच हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हनुमान भक्तांनी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचा कडी-कोयंडा लोखंडी टॉमीच्या सहाय्याने तोडला आणि दानपेटीतील जवळपास पाच हजार रुपये चोरून नेले. यावेळी चोरट्यांनी दानपेटीत १११ रुपये ठेवून पसार झाल्याचे आढळून आले.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान भक्त सांडू राऊत हे दर्शनासाठी मंदिरात गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी ही बाब इतर हनुमान भक्तांच्या निदर्शनास आणून दिली. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मध्यवस्तीत असलेल्या हनुमान मंदिरालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सांडू राऊत यांनी टेंभुर्णी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

🔗 महाराष्ट्रातील इतर घडामोडी व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको