mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

भारताचा 29 धावांनी विजय | टी-20 विश्वचषकात अमेरिकेवर मात | India vs USA T20 World Cup

शेअर करा :

India vs USA T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या 84 धावांच्या खेळीमुळे भारताचा विजय.

India vs USA T20 World Cup

मुंबई : भारताने टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी बाद 162 धावा केल्या.

India vs USA T20 World Cup

टीम इंडियाचे पहिले चार गडी अवघ्या 46 धावांत बाद झाले होते. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी 49 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

India vs USA T20 World Cup

161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने 8 गडी गमावून 132 धावा केल्या. त्यामुळे भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार सूर्यकुमार यादव. एकीकडे विकेट्स पडत असताना शेवटपर्यंत उभा राहून त्यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

🔗 👉 क्रीडा क्षेत्रातील देश-विदेशातील इतर महत्त्वाच्या सामन्यांच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको