mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

खामगाव एमआयडीसीत पुठ्ठा कारखान्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान | Khamgaon MIDC factory fire

शेअर करा :

Khamgaon MIDC factory fire : खामगाव एमआयडीसीतील ओरिजिन पॅक पुठ्ठा निर्मिती कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग. कोट्यवधींचा माल जळून खाक; कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी घेतली घटनास्थळी भेट.

Khamgaon MIDC factory fire
खामगाव : खामगाव एमआयडीसी परिसरातील एका पुठ्ठा निर्मितीच्या कारखान्याला भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) रात्री घडली. या आगीत संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी सापडला.

खामगाव एमआयडीसीमधील ओरिजिन पॅक कंपनी येथे कागदी पुठ्ठा निर्मितीचे काम सुरू आहे. शुक्रवारी रात्री अचानक शॉर्टसर्किट झाल्याने कारखान्यात आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण कारखान्यातील पुठ्ठा साठ्यावर ताबा मिळवला.

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील इतर कारखानदारांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या कागदी पुठ्ठ्यांमुळे आग वेगाने पसरली.

🔗 👉 बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

या भीषण आगीत कारखान्यातील कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी एमआयडीसीतील घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशी भडकली, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको