rabid dog attack in Wadegaon : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे पिसाळलेल्या श्वानाने महिलांसह २४ ग्रामस्थांना चावा घेतल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.


वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत ९ फेब्रुवारी रोजी पिसाळलेल्या श्वानाने गावात धुमाकूळ घालत महिलांसह एकूण २४ ग्रामस्थांना चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
वाडेगाव परिसरात पिसाळलेल्या श्वानाने महिला, पुरुष तसेच मुलींवर हल्ला करत अनेकांना जखमी केले. या घटनेनंतर काही भागातील महिलावर्ग घराबाहेर जाण्यासही धजावत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमींपैकी ५ ते ६ जणांनी डॉ. शिवा करंजकर यांच्या खासगी दवाखान्यात उपचार घेतले, तर उर्वरित जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत करवते यांनी दिली. दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून पिसाळलेल्या श्वानाचा बंदोबस्त करावा, जेणेकरून ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली भीती दूर होईल, अशी मागणी अनिल बारबुदे, दानिश काजी, सचिन धनोकर, सुनील घाटोळ, सुनील मानकर, संदीप ठोंबरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
🔗 👉 अकोला व विदर्भातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
अशी आहेत जखमींची नावे
जखमींमध्ये वंदना सरप (३५), बबिता महाले (४०), चंदा धनोकार (५०), पर्वता नेमाडे (७०), सुनीता आठे (३५), हर्षा फाळके (४६), कमला इंगळे (७२), नवल सरप (१६), ज्ञानेश्वर मसने (४२), प्रिया डोंगरे (३०), शेषराव अवचार (७०), मुलचंद काकडे (६१), अरुण चिंचोलकर (४५), अरविंद अग्रथे (२८), सुरेश भटकर (६५), हरिश्चंद्र शिरसाट (६५), दानिश काजी बेग (२१), कुणाल खंडारे (२२), ज्ञानेश्वर लहाने (२२), भक्ती वाडकर (१६), शेख सईद (३६), तुषार भटकर (२४), बेबीबाई राजघडे (५५), गजानन लोखंडे (४८), प्रकाश वासुदेव ठोंबरे (६५), सुमती भुस्कुटे यांचा समावेश आहे.


