mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

अकोल्यातील जवाहर नगरमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड; सीसी कॅमेऱ्यात घटना कैद | Akola molestation CCTV incident

शेअर करा :

Akola molestation CCTV incident : अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू, सुरक्षा वाढवण्याची मागणी.

Akola molestation CCTV incident

अकोला : अकोला शहरात गुन्हेगारीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत असतानाच जवाहर नगर परिसरात विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या दोन मुलींमधील एका मुलीची दुचाकीवरून आलेल्या तरुणाने छेड काढल्याचा प्रकार घडला असून संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

ही घटना अकोला शहरातील कोचिंग क्लासेससाठी ओळखल्या जाणाऱ्या जवाहर नगर परिसरात घडली. शहरासह ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थिनी शिकवणीसाठी या भागात येत असल्याने या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींपैकी एका मुलीच्या जवळ दुचाकीवरून आलेल्या तरुणाने मागून येत तिची छेड काढली. संबंधित तरुणाने मुलीच्या छातीला स्पर्श करून तिच्या गळ्यातील आयडी कार्ड (ओळखपत्र) घेत दुचाकीवरून पसार झाल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये नोंद झाला आहे.

जवाहर नगर परिसर हा कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी येत असतात. त्यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी पुढे येत आहे. नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी परिसरात दामिनी पथकाची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

यापूर्वीही घडले प्रकार

या परिसरात यापूर्वीही मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्याची चर्चा असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लग्न मिरवणुकीतील तलवार फिरवण्याची घटना

काही दिवसांपूर्वी अकोल्यात लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान नंग्या तलवारी फिरवल्याचा प्रकारही समोर आला होता. डीजेच्या तालावर काही तरुण तलवारी फिरवत असताना बाजूला उभ्या असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्याला तलवार लागून तो जखमी झाला होता. जखमी मुलावर बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्याच्या डोक्याला पाच टाके घालावे लागले. या प्रकरणी बाळापूर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये म्यानातून तलवार काढल्यास प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

— प्रतिनिधी | महालोकवार्ता

🔗 क्राईम संदर्भातील इतर घडामोडी वाचण्यासाठी गुन्हे विभागाला भेट द्या.

🔗 अकोल्यासह परिसरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी विदर्भ विभागाला भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको