mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

आरोग्यमंत्र्यांचा आउटसोर्सिंग संस्थांना इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई | सार्वजनिक आरोग्य विभाग निर्णय | Maharashtra Health Department Outsourcing Services Action

शेअर करा :

Maharashtra Health Department Outsourcing Services Action : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील आउटसोर्सिंग संस्थांना कडक इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व ब्लॅकलिस्टची चेतावणी दिली आहे. जिल्हास्तरावर तपासणीचे आदेश.

Maharashtra Health Department Outsourcing Services Action

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात बाह्य स्त्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) सेवा देणाऱ्या संस्थांच्या कामकाजात कोणताही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच गरज पडल्यास संबंधित संस्थांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिला आहे.
आरोग्य विभागामार्फत सिटीस्कॅन, एमआरआय, डायलेसिस, स्टेमी, एक्स-रे, रक्त तपासण्या (HLL), आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ व १०२, मनुष्यबळ पुरवठा, आहार सेवा, स्वच्छता सेवा, तांत्रिक सहाय्य, देखभाल-दुरुस्ती तसेच वाहन पुरवठा अशा विविध सेवा बाह्य संस्थांद्वारे दिल्या जातात. या सेवा देताना संबंधित संस्थांनी नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

👉 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी महाराष्ट्र कॅटेगरीला भेट द्या.

१५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश

कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देणे, रुग्णांना सकस आहार उपलब्ध करून देणे आणि स्वच्छता सेवा योग्य पद्धतीने राबविणे याबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष तपासणी करावी व १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. अहवालात त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थांची बिले तात्काळ थांबवून कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Maharashtra Health Department Outsourcing Services Action
बैठकीदरम्यान मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, सेवा देताना गुणवत्ता, पारदर्शकता आणि करारातील अटींचे पालन अनिवार्य आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी व मूल्यांकन करावे. करारभंग करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई, करार रद्द करणे आणि आवश्यक असल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
बाह्य संस्थांमार्फत कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनासह सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश देताना, चुकीचे काम करणाऱ्या सेवा पुरवठादारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांना उपलब्ध सुविधांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच राज्यभर सुरू असलेल्या सिकल सेल, ॲनिमिया, हत्तीरोग, क्षयरोग आणि मलेरिया तपासणी व निर्मूलन मोहिमा, तसेच माता मृत्यूदर कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

👉 राज्य, तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी ब्रेकिंग कॅटेगरीला भेट द्या.

सामान्य नागरिकांसाठी सरकारी रुग्णालये हा महत्त्वाचा आधार असल्याची जाणीव ठेवून रुग्णांशी चांगली वर्तणूक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यावर भर देण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात आयोजित या बैठकीस आरोग्य संचालक, उपसंचालक तसेच इतर उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको