mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

रील स्टार होण्याच्या नादात मैत्रिणीच्या घरात चोरी; अकोल्यात १९ वर्षीय तरुणीसह चौघांना अटक | Akola Theft Case Reel Star Girl Arrest

शेअर करा :

Akola Theft Case Reel Star Girl Arrest : अकोल्यात रील स्टार होण्याच्या नादात १९ वर्षीय तरुणीने मैत्रिणीच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचा प्रकार उघड. पोलिसांनी २१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करत चौघांना अटक केली.

Akola Theft Case Reel Star Girl Arrest

अकोला : सोशल मीडियावर रील स्टार होण्याच्या नादात एका १९ वर्षीय तरुणीने थेट चोरीचा मार्ग अवलंबल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. मैत्रिणीच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी तरुणीसह चार जणांना अटक केली असून तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी समीक्षा गवईसह तिचे तीन साथीदारांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

👉 “अकोल्यातील इतर गुन्हेगारी बातम्या वाचा” – गुन्हे वार्ता 

मैत्रिणीच्या घरावरच डोळा

जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सागर कॉलनी, वाशिम बायपास परिसरात राहणाऱ्या नेहा राजेश सावदेकर (वय ३०) यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. १२ फेब्रुवारी रोजी त्या घरासमोरील शेजारी कामानिमित्त गेल्या असताना अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे तक्रारीत नमूद होते.

प्राथमिक तपासात कोणताही तांत्रिक पुरावा मिळत नसतानाही पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास सुरू ठेवला.

Akola Theft Case Reel Star Girl Arrest

रील बनवण्याच्या बहाण्याने आखला प्लॅन

तपासादरम्यान फिर्यादीच्या शेजारी राहणारी समीक्षा अनिल गवई (वय १९) हिनेच चोरीचा कट रचल्याचे उघड झाले. रील तयार करण्याच्या बहाण्याने तिने फिर्यादीला स्वतःच्या घरी बोलावून गुंतवून ठेवले आणि त्याचवेळी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून दागिने चोरी केल्याचा पोलिस तपासात निष्कर्ष समोर आला आहे.

Akola Theft Case Reel Star Girl Arrest

चोरीतील मुद्देमाल

चोरी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये —

सोन्याचा नेकलेस – ५२ ग्रॅम

दोन मोठे नेकलेस – ४० ग्रॅम

चेन व लॉकेट – १२ ग्रॅम

तीन अंगठ्या – १५ ग्रॅम

दोन पोत – २० ग्रॅम

ब्रेसलेट – ३ ग्रॅम

लहान नेकलेस – १८ ग्रॅम

रोख रक्कम – ₹९०,०००

असा ऐवज चोरीस गेला होता.

👉 अकोल्यासह परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा – विदर्भ

प्रियकर व साथीदारांची मदत

पोलिस तपासात समीक्षा गवई हिने तिचा परिचित ऋतीक अजाबराव शृंगारे (२२) याला अकोल्यात बोलावून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर वैभव संजय गोपनारायण (२३) आणि समीर प्रदीप तेलखडे (१९) यांच्या मदतीने चोरीचा मुद्देमाल लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपास पथकाने अमरावती येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

२१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून अंदाजे १३८ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे २१ लाख रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (₹५० हजार) असा एकूण २१,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

👉 राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा – महाराष्ट्र

जुने शहर पोलिसांची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको