mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

पैठण कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडले; २० जणांविरुद्ध गुन्हा | Paithan Jail Mobile Phone Case

शेअर करा :

Paithan Jail Mobile Phone Case : पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहाच्या विहामांडवा शेती शेडमध्ये कैद्यांकडे अवैध मोबाईल फोन आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात २० कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Paithan Jail Mobile Phone Case

पैठण : येथील खुल्या जिल्हा कारागृहाच्या अंतर्गत असलेल्या विहामांडवा येथील शेती शेडमध्ये बंदिवानांकडे अवैध मोबाईल फोन आढळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे २० कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकारात कारागृहातील एका कर्मचाऱ्यानेच कैद्यांना मदत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

👉 राज्यभरातील गुन्ह्ये विषयक ताजा घडामोडींसाठी वाचा : गुन्हेवार्ता

छत्रपती संभाजीनगर मध्य विभागाचे विशेष कारागृह महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार शनिवार, ७ मार्च रोजी सकाळी सुमारे ७ वाजता अतिरिक्त अधीक्षक सचिन साळवे यांच्या पथकाने विहामांडवा येथील शेती शेडवर अचानक छापा टाकला. या वेळी बंदिवान राहत असलेल्या ठिकाणी झडती घेण्यात आली. तपासादरम्यान मोबाईल फोन तसेच काही प्रतिबंधित साहित्य आढळून आले.

या प्रकरणात कारागृह कर्मचारी सलमान शफिक शेख यांनी पदाचा गैरवापर केल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

👉 राज्यातील ताजा घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र

या संदर्भात वरिष्ठ तुरुंग अधिकारी दीपक लिंगाप्पा भोसले यांच्या फिर्यादीवरून शेख रफिक, रामू सोनवणे, आसिफ शेख, नागेंद्र कनोजिया, राजेश चौधरी, मंगेश गुमसते, शगीर शकील शेख, शिवाजी वडजे, मुजफ्फर माशुक अली शेख, कृष्णा पवार, आकाश शिंगे, शेख चांद पाशा, जयसिंग राठोड, आसिफ खान शब्बीर खान, धारासिंग बावरी, नरसिंग तळणीकर, जयसिंग पावरा, सुनील पाटील, मुस्तफा शेख आणि नीलेश महामुनी या २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 जगभरातील ताजा घडामोडींसाठी वाचा : विश्व

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको