mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

समृद्धी महामार्गावर ट्रकला आग; इन्व्हर्टर बॅटऱ्यांसह वाहन जळून खाक | Samruddhi Expressway Truck Fire

शेअर करा :

Samruddhi Expressway Truck Fire : दुसरबीडजवळ समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टर बॅटऱ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. चालक बचावला, मात्र ट्रक व माल पूर्णतः जळून खाक.

Samruddhi Expressway Truck Fire
डोणगाव : समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना रविवारी (१२ एप्रिल २०२६) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दुसरबीडजवळ घडली. या आगीत ट्रकमधील इन्व्हर्टर बॅटऱ्यांसह संपूर्ण वाहन जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, बनारसहून यूपी ६५ आर डी २१४० क्रमांकाच्या ट्रकमधून इन्व्हर्टर बॅटऱ्या घेऊन चालक रोहित कुमार (रा. गाजीपूर) नाशिककडे निघाला होता. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३१२ जवळ पोहोचल्यावर ट्रकमधील बॅटऱ्यांमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.

👉 हे देखील वाचा : समृद्धी महामार्ग अपघात: कारंजा जवळ भीषण धडक, चालक गंभीर, बाळ सुखरूप

चालकाचे प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला

धूर दिसताच चालकाने तत्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. मात्र काही क्षणातच बॅटऱ्यांनी भीषण स्वरूप धारण करत आगीचा भडका उडाला. आग इतकी वेगाने पसरली की, काही वेळातच ट्रक आणि त्यातील सर्व बॅटऱ्या पूर्णतः जळून खाक झाल्या.

अग्निशमन दलाची धाव; आगीवर नियंत्रण

घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, तसेच शेख नासिर, नाजीम चौधरी, श्रीकृष्ण दूंगू, गायकवाड, इंदल राजपूत यांचा समावेश होता.

तसेच समृद्धी महामार्गावरील दोन लहान अग्निशामक वाहने आणि मेहकर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. तिन्ही वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मोठे आर्थिक नुकसान

या आगीत ट्रकसह त्यातील सर्व इन्व्हर्टर बॅटऱ्या जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तथापि, चालकाने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे त्याचा जीव वाचला असून मोठी दुर्घटना टळली.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 बुलढाण्यासह परिसरातील महत्त्वाच्या ताजा घडामोडीसाठी वाचा – विदर्भ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको