mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

अल्पवयीन मुलीचा छळ; घरात घुसून मारहाण करणाऱ्या आरोपीस ५ महिने कारावास | Akola minor harassment case court verdict 5 months jail POCSO case

शेअर करा :

Akola minor harassment case court verdict 5 months jail POCSO case : अकोला जिल्ह्यातील आगीखेड येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून घरात घुसून मारहाण करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ५ महिन्यांचा कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.

Akola minor harassment case court verdict 5 months jail POCSO case
अकोला : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या घरी घुसून मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०१ यांनी दिलेल्या निकालानुसार आरोपी शुभम विठ्ठल आरखराव (वय २८, रा. आगीखेड, ता. पातुर, जि. अकोला) याला ५ महिन्यांचा कारावास व २,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

👉 हे देखील वाचा : ‘ऑपरेशन प्रहार’ : अकोल्यात १३.८० लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; एक जेरबंद

प्रकरणातील माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०१८ रोजी पातुर पोलीस ठाण्यात फिर्यादीने आपल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेची तक्रार दाखल केली होती. आरोपी शुभम आरखराव हा पीडितेचा पाठलाग करत तिच्याकडे वाईट नजरेने पाहून त्रास देत होता. ५ सप्टेंबर २०१८ रोजी पीडिता घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी घुसला. त्याने तिला लग्नाची मागणी घालत नकार दिल्यास स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली आणि तिच्या गालावर चापट मारली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०३/२०१८ अंतर्गत भादंवि कलम ३५४(ड), ३२३, ४५२, ५०६ तसेच पोक्सो कायद्यांतर्गत कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय महाले यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

न्यायालयात एकूण ५ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. फिर्यादी, पीडिता व इतर साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. भादंवि कलम ४५२ अंतर्गत ५ महिन्यांचा कारावास व २,५०० रुपयांचा दंड, तर दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद ठोठावण्यात आली. तसेच कलम ३२३ अंतर्गत २ महिन्यांची साधी कैद सुनावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेपैकी २,००० रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.

👉 हे देखील वाचा : मेहकरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सहाय्यक महसूल अधिकारी २० हजारांसह रंगेहात

या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता राजेश अकोटकर यांनी मांडली. पातुर येथील पोलीस हवालदार वासुदेव मात्रे व सीएमएस सेलचे सहायक पोलीस उपनिरीक्षक फजलुर रहमान काझी यांनी पैरवीचे कामकाज पाहिले. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन व ठाणेप्रभारी डोपेवाड यांनी मार्गदर्शन केले.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 गुन्हे जगतातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : गुन्हे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको