Bhendwal Ghatmandani Prediction 2026 : बुलढाण्यातील भेंडवळ येथील 370 वर्षांची परंपरा असलेल्या घटमांडणी भाकितात यंदा अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पिकांची मोठी नासाडी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त.


जळगाव जामोद (बुलढाणा): सुमारे 370 वर्षांची परंपरा लाभलेल्या भेंडवळ येथील ‘घटमांडणी’ भाकिताने यंदा शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढवली आहे. 20 एप्रिल रोजी पहाटे जाहीर करण्यात आलेल्या या भाकितात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनचा अंदाज: सुरुवात सामान्य, पण पुढे धोका
भाकितानुसार:
मान्सूनचा पहिला महिना सर्वसाधारण राहणार.
मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता.
शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा.
पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याचा अंदाज.
शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
या परिणामाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता.
रोगराई वाढण्याचाही इशारा
या भाकितात केवळ हवामानच नाही, तर देशात रोगराई वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे
संरक्षण खात्यावर ताण?
भाकितानुसार:
देशाचा राजा (सत्ता) स्थिर राहील
मात्र संरक्षण खात्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीला धोका आणि नैसर्गिक संकटांची चिन्हे.
अवकाळी पाऊस, महापूर यामुळे पर्यावरणीय संकट वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
परंपरेवर शेतकऱ्यांचा विश्वास
ही भाकिते चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी जाहीर केली. भेंडवळच्या या घटमांडणीला ऐकण्यासाठी बुलढाणा,
विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश या भागांमधून मोठ्या संख्येने शेतकरी, व्यावसायिक आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
भेंडवळच्या परंपरागत घटमांडणीच्या या भाकिताने यंदाचा हंगाम आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आता या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शेतकरी आधीच तयारी करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


