mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

फेमिना मिस इंडिया 2026: गोव्याची साध्वी सतीश सैल विजेती, आता Miss World 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व | Femina Miss India 2026 Winner

शेअर करा :

Femina Miss India 2026 Winner : भुवनेश्वर येथे झालेल्या फेमिना मिस इंडिया 2026 स्पर्धेत गोव्याच्या साध्वी सतीश सैलने 30 स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. आता ती Miss World 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Femina Miss India 2026 Winner
भुवनेश्वर (ओडिशा) : देशभरातील तरुणींमध्ये प्रेरणा निर्माण करणाऱ्या ‘फेमिना मिस इंडिया 2026’ स्पर्धेत गोव्याच्या साध्वी सतीश सैल हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. अंतिम क्षणी तिचं नाव जाहीर होताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं आणि साध्वीच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

👉 मनोरंजन विश्वातील ताज्या घडोमोडींसाठी वाचा : मनोरंजन

ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) मध्ये पार पडलेल्या या 61 व्या स्पर्धेत देशभरातील 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक फेरीत साध्वीने आपली शालीनता, आत्मविश्वास आणि प्रभावी संवादकौशल्य यामुळे परीक्षकांवर छाप पाडली. अंतिम फेरीत तिच्या उपस्थितीने आणि विचारांच्या स्पष्टतेने तिला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळं ठरवलं आणि ती विजेती म्हणून घोषित झाली.

मुकुट जिंकताना अविस्मरणीय क्षण

महाअंतिम सोहळ्यात मागील वर्षीच्या विजेत्याने साध्वीच्या डोक्यावर ‘मिस इंडिया’चा मुकुट ठेवताच, त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान सर्वांच्या नजरेत भरला. तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवारानेही या यशाचा जल्लोष केला.

सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्तेचीही छाप

गोव्याची असलेली साध्वी सतीश सैल ही केवळ सुंदरच नाही, तर अत्यंत बुद्धिमानही आहे. तिने अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी घेतली आहे. तिला सात भाषा अवगत आहेत. या सर्व गुणांच्या जोरावर तिने ‘ब्युटी विथ ब्रेन्स’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकार केली आहे.

आता जागतिक मंचावर भारताचं प्रतिनिधित्व

या विजयानंतर आता साध्वी ‘मिस वर्ल्ड 2027’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्याकडून जागतिक स्तरावरही देशाचं नाव उज्ज्वल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

👉 देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या : भारत

इतर विजेते

प्रथम उपविजेती : महाराष्ट्राची राजनंदिनी पवार
द्वितीय उपविजेती : जम्मू-काश्मीरची श्री अद्वैता

प्रेरणादायी संदेश

साध्वी सतीश सैल हिचं यश हे केवळ सौंदर्यस्पर्धेचं नाही, तर मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य तयारी यांच्या जोरावर कोणतंही स्वप्न साकार करता येतं, याचं उत्तम उदाहरण ठरलं आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको