mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Shivaji Kon Hota Book Controversy Buldhana |‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद; आमदार गायकवाडांवर आरोप, बुलढाण्यात सामूहिक वाचन

शेअर करा :

Shivaji Kon Hota Book Controversy Buldhana : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या वादातून बुलढाण्यात वातावरण तापले. आमदार संजय गायकवाड यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक, पुस्तकाचे सामूहिक वाचन सुरू.

Shivaji Kon Hota Book Controversy Buldhana
बुलढाणा : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून वाद पेटला असून, आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना कथितरीत्या शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरणाने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुस्तकाचे सामूहिक वाचन सुरू करण्यात आले आहे.

👉 हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून केंद्रावर टीका; मतदारसंघ पुनर्रचनेचा आरोप – यशोमती ठाकूर

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करत, “जे महिलांचा आदर करू शकत नाहीत, त्यांना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.

ऑडिओ क्लिपमुळे वाद वाढला

व्हायरल झालेल्या सुमारे ९ मिनिटांच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी ३८ वेळा शिवीगाळ केल्याचा आरोप निलेश जाधव यांनी केला आहे. तसेच, पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आई आणि पत्नीबद्दलही अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

👉 हे देखील वाचा : आपमध्ये फूट; राघव चड्ढांसह ७ खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

वंचितकडून सामूहिक वाचन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आणि विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले.

टीकेची धार तीव्र

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना निलेश जाधव यांनी आमदार गायकवाड यांच्यावर घणाघाती टीका करत, “आमदार गायकवाड हे महाराष्ट्राचे जेम्स लेन ठरत आहेत,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

— प्रतिनिधी महालोकवार्ता

👉 बुलढाणासह परिसरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी वाचा : राजकारण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको