Akola Patur Road Accident Two Brothers Injured : अकोला-पातूर महामार्गावर कापशीजवळ कार व दुचाकीची जोरदार धडक. लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांना गंभीर दुखापत, GMC अकोला येथे उपचार सुरू.


वाडेगाव : भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी अकोला-पातूर महामार्गावर कापशीजवळ घडली. धाकट्या भावाच्या लग्नासाठी निमंत्रण पत्रिका वाटण्याकरिता ते निघाले असताना हा अपघात झाला. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
👉 हे देखील वाचा :१५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; पिंजर पोलिसांची तत्पर कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, कापशीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर भरधाव चारचाकी वाहन आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातावेळी घटनास्थळी पोलीस उपलब्ध नसतानाही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जखमींना तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे उपचारासाठी हलवले.


अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही भावांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र नेमकी दुखापत किती आणि कोणत्या प्रकारची आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वैद्यकीय तपासणीनंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळणार आहे.
आनंदाच्या वातावरणात पसरली चिंता
जखमी तरुणांकडे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका आढळून आल्या असून २९ एप्रिल रोजी त्यांच्या घरी विवाह सोहळा होणार होता. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या मुलांचा अपघात झाल्याची बातमी समजताच कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे.
👉 हे देखील वाचा : चंद्रपूरमध्ये मानव अधिकार आयोगाचा दौरा; आदिवासी वनहक्कांचा सखोल आढावा
रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या अपघातामुळे अकोला-पातूर मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गावर अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान, जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता
अकोलासह विदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ


