mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Sanjay Gaikwad Buldhana Protest Support | आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक; समर्थकांचा शक्तीप्रदर्शन

शेअर करा :

Sanjay Gaikwad Buldhana Protest Support : बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी जयस्तंभ चौकात दुग्धाभिषेक करत शक्तीप्रदर्शन केले. महिला आघाडीच्या अनुजा सावळे यांनी विरोधकांवर टीका करत भूमिका स्पष्ट केली.

Sanjay Gaikwad Buldhana Protest Support

बुलढाणा : कोल्हापूर येथे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलने सुरू असतानाच, बुलढाण्यात त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांच्या भूमिकेला समर्थन दिले. शनिवारी दुपारी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थकांनी आपली एकजूट दाखवली.

👉 हे देखील वाचा : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद; आमदार गायकवाडांवर आरोप, बुलढाण्यात सामूहिक वाचन

या वेळी शेकडो शिवसैनिक आणि गायकवाड समर्थक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. कार्यक्रमादरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या अनुजा सावळे आणि जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

अनुजा सावळे यांनी सांगितले की, वाद केवळ पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण झाला असून काही राजकीय व्यक्तींनी त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नमूद केले की, आमदार संजय गायकवाड यांनी याप्रकरणी दिलगिरीही व्यक्त केली आहे.

👉 हे देखील वाचा : अकोला-पातूर मार्गावर भीषण अपघात : लग्नाच्या पत्रिका वाटताना दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

त्या पुढे म्हणाल्या की, आ. गायकवाड हे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली आहेत. विरोधकांनी या मुद्द्याला राजकीय रंग न देता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, या घटनेमुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून समर्थक आणि विरोधकांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

— प्रतिनिधी महालोकवार्ता

👉 बुलढाणासह परिसरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी वाचा : राजकारण

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको