mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Medshi furniture shop fire | मेडशीतील शाहबाबू फर्निचर दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

शेअर करा :

Medshi furniture shop fire : मेडशी-मालेगाव रोडवरील शाहबाबू फर्निचर दुकानाला पहाटे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सागवान फर्निचर, लाकूड व मशिनरी जळून खाक; शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज.

Medshi furniture shop fire

मेडशी : मेडशी–मालेगाव रोडवरील ‘शाहबाबू फर्निचर’ या दुकानाला शनिवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. या आगीत पलग, टेबल, सोफासेट, कपाट यांसह सागवानाचे कापून ठेवलेले लाकूड आणि मशिनरी पूर्णपणे जळून खाक झाली.

👉 हे देखील वाचा : आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक; समर्थकांचा शक्तीप्रदर्शन

घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकीचे कर्मचारी विनोद इंगळे व ज्ञानेश्वर सानप यांनी तात्काळ मालेगाव येथील अग्निशामन दलाशी संपर्क साधला. अग्निशामन दलाने घटनास्थळी पोहोचत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली; मात्र आग प्रचंड प्रमाणात पसरल्याने मोठे नुकसान टाळता आले नाही.

👉 हे देखील वाचा : अकोला-पातूर मार्गावर भीषण अपघात : लग्नाच्या पत्रिका वाटताना दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

या आगीत दुकानमालक शेख रशीद यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून काही तासांतच संपूर्ण दुकान जळून खाक झाले. मेडशी परिसर सागवान फर्निचरसाठी प्रसिद्ध असून येथील उत्पादनाला राज्यासह बाहेरील भागातही मोठी मागणी आहे. त्यामुळे या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.

— प्रतिनिधी महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको