Lungi Ngidi injury IPL 2026 : IPL 2026 च्या सामन्यात लुंगी एन्गिडी झेल घेताना पडून डोक्याला दुखापत; सामना काही काळ थांबवला. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ससमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले.


नवी दिल्ली : IPL 2026 मधील ३५ व्या सामन्यात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली. तिसऱ्या षटकात Priyansh Arya याने Axar Patel यांच्या चेंडूवर फटका मारल्यानंतर चेंडू हवेत गेला. यावेळी Lungi Ngidi याने ‘मिड-ऑफ’वरून मागे धावत झेल घेण्याचा प्रयत्न केला; मात्र चुकीचा अंदाज आल्याने तो मागे पडला आणि त्याचे डोके जमिनीवर जोरात आपटले. या अपघातानंतर एन्गिडी काही काळ मैदानावरच पडून राहिला, ज्यामुळे मैदानात एकच खळबळ उडाली.
Our thoughts are with Lungi Ngidi who sustained a head injury during #DCvPBKS match.
Wishing him a speedy recovery.#TATAIPL pic.twitter.com/TpQfnGOfJV
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
घटनेनंतर वैद्यकीय पथक तातडीने मैदानात दाखल झाले आणि उपचार सुरू करण्यात आले. परिस्थिती गंभीर वाटल्याने सुमारे चार मिनिटांच्या उपचारानंतर एन्गिडीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे सामना सुमारे १५ मिनिटे थांबवण्यात आला होता. दरम्यान, मैदानावरील सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक Ricky Ponting यांच्यासह अनेक जण परिस्थिती पाहून धास्तावलेले दिसले.
👉 हे देखील वाचा : ७२ चेंडूत एकही षटकार नाही! साकिब हुसेनची आयपीएलमध्ये दमदार एंट्री
या दुखापतीमुळे लुंगी एन्गिडी सामन्यातून पूर्णपणे बाहेर झाला. त्याच्या जागी Dushmantha Chameera याला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली.
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास Delhi Capitals संघाने Punjab Kings समोर २६५ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले. Arun Jaitley Stadium येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २ गडी गमावून २६४ धावांचा डोंगर उभारला, जो या हंगामातील सर्वोच्च स्कोअर ठरला. प्रत्युत्तरात पंजाबने झपाट्याने सुरुवात करत ५ षटकांत एकही गडी न गमावता ९० धावा केल्या.
एन्गिडीची दुखापत; मैदानावर काही काळ तणावपूर्ण शांतता
या अपघातानंतर काही क्षण मैदानावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खेळाडूंपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वजण एन्गिडीच्या प्रकृतीबाबत चिंतित दिसत होते. वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे पुढील उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीबाबत पुढील अपडेटची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


