Illegal Sand Mining Action Nanded : नांदेड जिल्ह्यात महसूल प्रशासनाची धडक कारवाई करत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या तीन इंजिन व एक बोट स्फोट करून नष्ट करण्यात आली. सुमारे १३ लाखांचे साहित्य जप्त.


नांदेड : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने सोमवारी पहाटे मोठी धडक कारवाई केली. नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या तीन इंजिनांसह एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आली. जप्त व उद्ध्वस्त करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे १३ लाख रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
👉 हे देखील वाचा : परभणीत ९ खत विक्री केंद्रांवर कारवाई; परवाने निलंबित
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात मौजे भनगी येथे पार पडली. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी आणि शासनाच्या महसुलाला बसणारा फटका लक्षात घेता प्रशासनाने कठोर पावले उचलत ही कारवाई केली.


कारवाईदरम्यान नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, रमेश गिरी, राजेश बरोडा, महेश जोशी, गोपीनाथ कल्याणकर, पोलीस कर्मचारी श्री नागरगोजे आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र


