mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

लाडकी बहीण योजना: आता QR कोडद्वारे ई-केवायसी; नागपुरात विशेष मोहीम सुरू | Ladki Bahin Yojana QR Code eKYC

शेअर करा :

Ladki Bahin Yojana QR Code eKYC : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी QR कोड सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात महिलांसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana QR Code eKYC
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने QR कोड आधारित नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता महिलांना थेट क्यूआर कोड स्कॅन करूनच ई-केवायसी करता येणार आहे, ही या मोहिमेतील सर्वात मोठी नाविन्यपूर्ण बाब ठरली आहे.

👉 नागपूरसह परिसरातील इतर महत्वाच्या बातम्या वाचा – विदर्भ

यापूर्वी ई-केवायसीसाठी संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया करावी लागत होती. मात्र, आता: QR कोड स्कॅन करा आणि थेट ई-केवायसी पेजवर पोहोचा
मोबाईलवरून काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत होईल. पूर्ण तांत्रिक अडचणी कमी होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठीही ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. लाडकी बहीण योजनेत QR कोडद्वारे ई-केवायसीची सुविधा ही महिलांसाठी मोठा दिलासा ठरणारी आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी 30 एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ई-केवायसीतील चुका दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. शासनाने ई-केवायसीसाठी दिलेली मुदत वाढवून ३० एप्रिल २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली आहे.

 

सेवा केंद्रांवर विनामूल्य सुविधा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार, सर्व आपले सरकार सेवा केंद्रांवर (CSC) ई-केवायसी सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१० लाखांहून अधिक लाभार्थी

नागपूर जिल्ह्यात सुमारे १० लाख ९० हजार महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.
यापैकी काही महिलांची ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे त्या लाभापासून वंचित होण्याची शक्यता होती.

अशी करा QR कोडद्वारे ई-केवायसी

दिलेला QR कोड मोबाईलने स्कॅन करा.
थेट अधिकृत वेबसाईट उघडेल.
आधार क्रमांक टाका.
OTP पडताळणी करा.
माहिती भरून सबमिट करा.

काय आहे महत्व?

QR कोडमुळे प्रक्रिया जलद + सोपी + सर्वांसाठी उपलब्ध झाली.
डिजिटल साक्षरता कमी असलेल्या महिलांनाही फायदा.
कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महत्त्वाचा टप्पा.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील सर्व गरजु व पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळावा व कोणतीही पात्र बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ई-केवायसीबाबत व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ज्या लाभार्थी महिलांची यापूर्वी केलेली ई-केवायसी चुकलेली आहे अशा पात्र महिलांनी यात दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा.
– कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, नागपूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको