Maharashtra voter list suspicious names 50 lakh : महाराष्ट्राच्या मतदार यादीतील ५० लाख नावे संशयास्पद असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा. SIR मोहिमेअंतर्गत चिखली मतदारसंघात २४ हजार नावांवर प्रश्नचिन्ह.


बुलढाणा : महाराष्ट्राच्या मतदार यादीतील सुमारे दीड कोटी नावांपैकी तब्बल ५० लाख नावे संशयास्पद असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या Kirit Somaiya यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार देशातील २२ राज्यांमध्ये ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) ही विशेष गहन पुनरावृत्ती मोहिम राबवली जात असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
👉 हे देखील वाचा : आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक; समर्थकांचा शक्तीप्रदर्शन
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली असून, त्यानुसार सोमय्या राज्यभर दौरे करत आहेत. बुधवार, २९ एप्रिल रोजी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याला भेट दिली.
मतदार यादीची सखोल तपासणी (SIR)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली ‘एसआयआर’ मोहिम राबवली जात आहे. देशातील २२ राज्यांमध्ये मतदार यादीतील त्रुटी शोधून दुरुस्ती करण्यावर भर दिला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्याविषयी बोलताना सोमय्या यांनी चिखली मतदारसंघातील सुमारे २४ हजार नावे ही दुबार किंवा घुसखोरीची असल्याचा आरोप केला. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी चर्चा केल्याचेही सांगितले.
चिखली मतदारसंघात २४ हजार नावांवर संशय
चिखली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार किंवा संशयास्पद नोंदी असल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत प्रशासनाशी चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, एसआयआर मोहिमेमुळे राज्यातील मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता
बुलढाणासह परिसरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी वाचा : राजकारण


