mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: कारचा चुराडा, चौघे गंभीर जखमी; कंटेनर चालक फरार | Samruddhi Mahamarg Accident Washim

शेअर करा :

Samruddhi Mahamarg Accident Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरची जोरदार धडक. अपघातात चार जण गंभीर जखमी, एक किरकोळ जखमी. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार.

Samruddhi Mahamarg Accident Washim

वाशिम : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २१८+३०० येथे सकाळी सुमारे ७:३७ वाजता ही घटना घडली.

👉 हे देखील वाचा : Reel बनवताना बसचा भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असलेली एमएच ४७ बीझेड २२४२ क्रमांकाची कार समोरून जाणाऱ्या एचआर ५५ एक्यू ९३५८ क्रमांकाच्या कंटेनरला मागून जोरदार धडकली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चार जण गंभीर, एक किरकोळ जखमी

या अपघातात कार चालक राजेश मेघनाथ हरिजन (वय ३४, रा. सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश) यांच्यासह अन्य तीन सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर एक सहप्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

तात्काळ मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र अमानी येथील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे वाशिम येथील रुग्णालयात दाखल केले.

कंटेनर चालक पसार

दरम्यान, अपघातानंतर संबंधित कंटेनर घटनास्थळावरून निघून गेल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध सुरू केला आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 हे देखील वाचा : बुलढाणा दौऱ्यात श्याम मानवांचा आरोप: फडणवीसांनी अंधश्रद्धा वाढू दिली? ‘खरात’ प्रकरणावरून निशाणा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको