mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Reel बनवताना बसचा भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी Samruddhi Mahamarg Accident

शेअर करा :

Samruddhi Mahamarg Accident : मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात. चालक आणि वाहक रील बनवण्यात व्यस्त असल्याचा आरोप. अपघातात दीड वर्षीय बालकाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी; 6 जणांची प्रकृती गंभीर.

Samruddhi Mahamarg Accident

डोणगाव (जि.बुलढाणा)  : समृद्धी महामार्गावर फर्जापूर टोल नाक्याजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बस चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बेफिकरीमुळे झालेल्या या अपघाताने वाहन चालवताना मोबाईलचा वापर किती घातक ठरू शकतो?, असा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

👉 हे देखील वाचा : बाळापूरात आगीत घर जळून खाक; गरीब कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त

प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस रविवार १९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. प्रत्यक्षदर्शी आणि बसमधील प्रवाशांच्या माहितीनुसार, बस चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले होते, आणि त्याच निष्काळजीपणातून हा अपघात घडल्याचा आरोप केला जात आहे. अपघातानंतर बसने एका कारलाही धडक दिल्याने त्या वाहनाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

चिमुकल्याचा मृत्यू, अनेक जखमी

या अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मदतीला उशीर, नातेवाईकांचा आक्रोश

अपघातानंतर जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे जवळपास एक तास डॉक्टर अनुपस्थित असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मोबाईल वापराचा मुद्दा पुन्हा चर्चेत

या घटनेमुळे पुन्हा एकदा ड्रायव्हिंगदरम्यान मोबाईल वापरण्याचा प्रश्न समोर आला आहे. रील बनवण्याच्या नादात वाहन नियंत्रण सुटणे, प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, हे सर्व मुद्दे या अपघातातून अधोरेखित होत आहेत.

👉 हे देखील वाचा : अक्षय तृतीयेआधी अॅक्शन; बाभुळगावात बालविवाह रोखला, प्रशासनाचा सतर्क

ही घटना केवळ अपघात नसून, सोशल मीडिया आणि बेफिकिरी यांचा धोकादायक संगम असल्याचे स्पष्ट करते. एक निष्पाप जीव गमावल्याने आणि अनेक जखमी झाल्याने, अशा प्रकारच्या निष्काळजी वर्तनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको